महाराष्ट्र मुंबई

“संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत”

File Photo

मुंबई | शिवसेना खासदारांच्या एका शिष्टमंडळाने आज दुपारी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही समावेश होता. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

संजय राऊत एक नंबरचे ढोंगी असल्याचं म्हणत निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

संजय राऊत जितक्या झटपट दिल्लीतील आंदोलनाच्या ठिकाणी फोटो काढायला गेले तसे कधी मराठा आंदोलकांना भेटले नाहीत. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आंदोलनाला संजय राऊत कधी गेले नाहीत, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रातील आंदोलक नको फक्त महाराष्ट्र हे नाव राजकारण करण्यासाठी पाहिजे. संजय राऊत एक नंबर ढोंगी आहेत, असं निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”

“राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा”

गोरेगावमधील फिल्म स्टुडिओला भीषण आग!

“हिंदू काय रस्त्यावर पडले आहेत का?, सरकारला लाज वाटायला हवी”

काँग्रेसने शेतकऱ्याला पिंजऱ्यात पोपट बनवुन ठेवलं होतं, पण…- सदाभाऊ खोत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या