महाराष्ट्र मुंबई

“एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?”

मुंबई | मुंबईमधे बेस्ट प्रवाशी वाहतुकीसाठी महाराष्ट्र भरातून गेलेल्या एसटी प्रवाशांना सरकारने सुविधा पुरवल्या नसल्याच्या मुद्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

एसटी कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या सरकारचा निषेध करतो असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मारायला?, असा सवाल निलेश राणेंनी केलाय.

कर्मचाऱ्यांच्या जेवणात किडे सापडतात. त्यांच्या राहण्याची सोय नाही. काल त्यांची मुले रस्त्यावर झोपली. ते कसेबसे आपला जीव वाचवून त्या क्वोरंटाईन सेंटरमधून आजही न्यायाची अपेक्षा करतायत. मात्र सरकारला खरोखरच लाज वाटली पाहीजे, असा घणाघात निलेश राणे यांनी केलाय.

कोरोनासारख्या संकटामध्येसुद्धा हे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तिथे ड्यूटी करत आहेत. पण सरकार यांना काय देत आहे?, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

‘आता तुम्हीच मार्ग काढा’; मराठा आंदोलक शरद पवारांची घेणार भेट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या