बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानच्या अर्शदला पदक मिळालं असतं तर मलाही आनंद झाला असता- नीरज चोप्रा

नवी दिल्ली | टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपद मिळवून देणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचं सर्व देशभरात कौतुक होत आहे. नीरजच्या कामगिरीमुळे देशाची मान उंचावली आहे. नीरजवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. अशातच नीरजने पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

पाकिस्तानच्या अर्शदने पदक जिंकलं असतं तर आशिया खंडाचं नाव झालं असतं आणि मलाही आनंद वाटला असता. त्याला मी प्रत्यक्षात भेटून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत, असंही नीरजने सांगितलं आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम नीरजचा प्रतिस्पर्धी खेळाडू होता.

भारताला या स्पर्धेत सात पदक मिळाली आहेत. यात एक सुवर्ण, दोन ब्रांझ आणि चार कांस्य पदकाचा समावेश होता. भारत ऑलिम्पिक स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानावर होता. तर या स्पर्धेत पाकिस्तानला एकही पदक जिंकता आलं नाही.

दरम्यान, ऑलिम्पिकच्या पात्रता फेरीत अर्शदने 85.16 मीटर भाला फेकून त्यांच्या गटात तो पहिल्या क्रमांकावर राहिला. तर नीरजनेही 88.65 मीटर अंतरावर भाला फेकून तो वरच्या क्रमांकावर होता. अंतिम सामन्या अगोदर भारत-पाकिस्तान सामना होईल की काय? अशी चर्चा रंगली होती. परंतु अर्शद अंतिम सामन्यात पाचव्या क्रमाकांवर राहिला, म्हणुन त्याला पदक जिंकता आलं नाही.

थोडक्यात बातम्या-

“मराठीपेेक्षा हिंदी चित्रपटांना झुकतं माप देता, कुठं आहेत शाखरूख, सलमान?”

भारताला क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय रोजंदारीवर काम!

दिलासादायक! पुण्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल, वाचा आजची आकडेवारी!

पावसाचं पुन्हा कमबॅक! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

नीरज मराठाच, त्याच्या घरी मी जाऊन आलोय- खासदार संभाजीराजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More