नीरव मोदी दाढीमिशा वाढवून लंडनमध्ये फिरताना सापडला!

लंडन | पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून या ठिकाणी त्याचा मुक्तपणे वावर असल्याचे समोर आले आहे. ‘द टेलिग्राफ’ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबत सांगितलं आहे. 

नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटलं आहे.

भारतीय बँकिंग क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या घोटाळ्याचा (13 हजार कोटी) सुत्रधार असलेला नीरव मोदी गेल्या वर्षी भारतातून फरार झाला आहे. 

दरम्यान, इंटरपोलने गेल्या वर्षी जुलै महिन्यांत त्याच्या नावे रेड कॉर्नर नोटीसही काढली आहे. मात्र, अद्याप नीरव मोदी कोणाच्याही हाती लागलेला नाही.

महत्वाच्या बातम्या-

-रावसाहेब दानवेंना शिष्य म्हणायची लाज वाटते- पुंडलिक दानवे

विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपली; वनडेमध्ये झळकावलं 41 वं शतक

काँग्रेसची दुसरी यादी तयार; नाना पटोले भाजपच्या दिग्गज मंत्र्याविरोधात लढणार?

विश्वास नांगरे पाटलांची नाशिकमध्ये एन्ट्री करताच धडक कारवाई; 117 जणांना दणका

राष्ट्रवादी म्हणते; कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी…!