बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET ची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू

नवी दिल्ली | देशपातळीवरील वैद्यकीय शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेची म्हणजेच नीटची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सरकारकडून अखेर उत्तर मिळालं आहे. आज सरकारने तारीख जाहीर करून विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा दिला आहे.

कोरोना महामारीच्या संकटात वैद्यकीय प्रवेश परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपात होणार की, ऑफलाईन याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, आता नीट परीक्षा ऑफलाईन स्वरूपातच येत्या 12 सप्टेंबर रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.

देशपातळीवर तब्बल 198 शहरांमधील 3862 केंद्रांवर ऑफलाईन स्वरुपात कोरोना चे सर्व नियम पाळून 12 सप्टेंबर रोजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा होणार आहे. उद्या म्हणजेच 13 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून या वैद्यकीय परीक्षेसाठीचे अर्ज सुरू होणार आहेत. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षा बद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच सरकारने यावर परीक्षेची तारीख जाहीर करून उद्या पासून अर्ज प्रक्रिया स्वीकारण्यासंदर्भात निर्णय जाहीर केल्याने विद्यार्थीही आता परीक्षेची तारीख आणि स्वरूप माहिती असल्याने जोमाने अभ्यासाला लागले आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More