मनोरंजन

‘मी सुद्धा काही व्हर्जिन नाही’; पतीबद्दलच्या प्रश्नावर नेहाचं उत्तर

मुंबई | लोक फक्त शार्दूलच्या घटस्फोटांविषयी का बोलत आहेत? मीसुद्धा काही व्हर्जिन नाही. उलट शार्दूलने त्याचं प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केलं. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडलं. कमीत कमी शार्दूलने कमिटमेंट तरी दिली होती, असं अभिनेत्री नेहा पेंडसेने सांगितलं आहे.

नेहा पेंडसेच्या लग्नाला अवघे चार दिवस झाले आणि तिच्या लग्नाविषयी नेटकरी बरेच प्रश्न विचारु लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने या सर्व प्रश्नांची उत्तरं बेधडकपणे दिली आहेत.

यात काय मोठा विषय आहे? आजकाल करिअरला प्राधान्य देऊन अनेकजण उशिरा लग्न करतात. पण लग्नाआधी ते एकापेक्षा अधिक रिलेशनशिपमध्ये असतात. या रिलेशनशिपमधलं प्रेम, एकनिष्ठता, शारीरिक प्रेमाची गरज ही तेवढीच असते. फक्त त्यावर कायदेशीर ठपका नसतो, असं नेहा पेंडसे म्हणाली आहे.

दोन लग्नांमध्ये अपयश मिळाल्यानंतर लग्नसंस्थेवर विश्वास कायम ठेवणं काही सोपं नाही. यावरुन कळतं की त्या व्यक्तीला लग्नाचं किती महत्त्व आहे, असंही नेहाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या