बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ना रोहित ना विराट, बाबर आझम म्हणतो ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमध्ये धमाका करेल

मुंबई | आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता 17 ऑक्टोबरपासून टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 15 खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आता सर्वांचच लक्ष आता विश्वचषकाकडे लागलं आहे. अशातच आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मोठं वक्तव्य केलं आहे.

येत्या 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा नक्की विजय होईल, असा विश्वास बाबर आझमने व्यक्त केला आहे. पाकिस्तानने अनेक सामने युएईमध्ये खेळले आहेत, त्यामुळे पाकिस्तान विश्वचषकावर कब्जा करेल, असंही बाबर म्हणाला. त्यावेळी त्याला या विश्वचषकात कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल असा सवाल उपस्थित विचारण्यात आला.

टी ट्वेंटी फाॅरमॅटमध्ये विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, केन विल्यमसन आणि जो रूट यांनी प्रामुख्याने नावं घेतली जातात. आगामी विश्वचषकात न्यूझीलंडचा कर्णधान केन विल्यमसन धमाका करेल, असं भाकित बाबर आझमने केलं आहे. त्यामुळे आता बाबर आझमला स्वत:च्याच खेळीवर विश्वास नाही का?, असा सवाल देखील नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.

दरम्यान, भारतीय संघ विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. अक्षर पटेलच्या जागी आता इनफाॅम खेळाडू शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिल्यानं आता भारतीय संघाच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अजित पवारांना मुख्यमंत्री करणार का?’, शरद पवार म्हणतात…

“राज ठाकरे आणि नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर का पडावं लागलं?”

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

‘राज कुंद्राने माझ्याकडून अंगप्रदर्शन करून घेतलं आणि…’; शार्लिन चौप्राचा गंभीर आरोप

‘…म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More