बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन व्हा, उपाध्यक्ष होऊ शकता अट एकच…”, नेटकऱ्याच्या ट्विटकर अमृता फडणवीस भडकल्या

मुंबई |  सोशल माध्यमांवर सर्वजण बिंधास्तपणे मत मांडत असतात. मात्र काही नेटकरी एकदम खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात किंवा राजकीय नेत्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात. अशाच प्रकारे एका नेटकऱ्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत ट्विट केलं आहे. यावर अमृता फडणवीस भडकल्या आहेत.

संबंधित नेटकऱ्याने केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे अमृता फडणवीस या चांगल्याच संतापल्या आहेत. याबाबत त्यांनीही ट्विट करत नेटकऱ्यावर कारवाई करण्याची मदत मागितली आहे. या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांची मदत मागितली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

युजरने अमृता फडणवीस यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतील नोकरीविषयी ट्विटरवर एक टिप्पणी केली होती. मित्रांनो अ‍ॅक्सिस बँकेत चांगलाच स्कोप आहे. तुम्ही कॅशियर म्हणून जॉईन करुन थेट बँकेचे मॅनेजर अगदी उपाध्यक्ष (VP) होऊ शकता, अट एकच…., असं  ट्विटमध्ये व्यक्तिने म्हटलं होतं. यावरून अमृता फडणवीस भडकल्या आहेत.

दरम्यान, हा बघा महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा. स्वत:च्या पायांवर उभे असलेल्या आणि एखाद्या संस्थेत अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या महिलेला लक्ष्य केले जाते. पुरुषांशी तुलना करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो. अशाप्रकारची अनेक ट्विटस पोस्ट केली जातात. मुंबई पोलिसांनी याविरोधात कारवाई करावी. तुम्ही कोणत्याही दबावाखाली नसाल, अशी आशा करते, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस संबंधित युजरवर कारवाई करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील कृत्यानं महाराष्ट्र हादरला एकाच रुग्णवाहिकेत कोंबले ‘इतक्या’ रुग्णांचे मृतदेह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची बदनामी सहन केली जाणार नाही- संजय राऊत

नागरिकांना यावर्षीही बसणार वाढीव वीजबिलाचा फटका!

“माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत, मी कारवाईला घाबरत नाही”

कडक लॅाकडाऊन मात्र शेगावच्या लॅाजवर सुरु होता अत्यंत धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More