बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महात्मा गांधींच्या टोपीवरून नवा वाद; भाजप नेत्याने केला ‘हा’ दावा

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांचं नाव घेतल्याशिवाय भारतीय राजकारण पुर्ण होत नाही. देशात जेवढ्या निवडणुका झाल्या त्यात या दोन महापुरूषांचं नाव घेतलं नाही असं होत नाही. आताही गुजरात भाजपच्या नेत्याच्या अजब दाव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

गुजरात भाजपचे नवनियुक्त सरचिटणीस रत्नाकर हे आता वादाचं कारण ठरले आहेत. महात्मा गांधी यांनी कधीही गांधी टोपी घातली नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र ही टोपी परिधान करायचे, असा दावा रत्नाकर यांनी केला आहे. यावरून देशातील काॅंग्रेस नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

रत्नाकर यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची पाठराखण खुद्द गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली आहे. यामुळे भाजपवर काॅंग्रेस जोरदार टीका करताना पहायला मिळत आहे. नितीन पटेल म्हणाले की, रत्नाकर हे जे बोलले ते खरंच आहे. मी देखील आतापर्यंत कधी गांधी यांचा टोपी घातलेला फोटो पाहिला नाही, असंही ते म्हणाले आहेत.

रत्नाकर यांच्या या वक्तव्याने भाजप आणि काॅंग्रेस पुन्हा आमने-सामने आले आहेत. रत्नाकर यांच्या वक्तव्याचा निषेध करताना काॅंग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, ते आता स्वातंत्र्य सेनानी आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवर बोट दाखवत आहेत, अशा तिखट शब्दात काॅंग्रेसने टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा”

मन सुन्न करणारी घटना; वाढदिवसाच्या दिवशीच 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू

‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More