मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहेत. मुंबईत महिनाभरानंतर रविवारी पहिल्यांदाच सहाशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर आता कोरोनाचे नवे हॉटस्पॉट समोर आले आहेत.
सरकारच्या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्या बोरीवलीत आहे. तसंच, मुंबईतल्या कोरोनाबाधितांचे आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू बोरीवलीतच नोंदवले गेले आहेत.
सरकारच्या आकडेवारीनुसार बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर हे भाग पुन्हा कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या महिन्यात दररोज सरासरी तीनशे रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या आठवड्यापासून ही संख्या दररोज 600 वर पोहोचली आहे.
घाटकोपर, विद्याविहार आणि पंतनगर या भागातील 162 इमारती सील करण्यात आल्या. 14 झोपडपट्ट्या आणि चाळी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद
काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ, चालू सामन्यात खेळाडूचा मृत्यु
‘पूजा अरूण राठोड’ नावाने यवतमाळ जिल्ह्यात गर्भपाताचा प्रकार!
पुण्यात पुन्हा लाॅकडाऊन होणार का?; मुरलीधर मोहोळ म्हणाले…