बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! नव्या कोरोनापासून शरिराच्या ‘या’ अवयवाला आहे सर्वाधिक धोका

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. अशात नव्याने आढळून येणाऱ्या कोरोना रूग्णांच्या फुफ्फुसांवर कोरोनाचा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या छातीचा एक्स-रे रिपोर्टमध्ये बदल झालेला दिसून येत आहे. या एक्स-रे रिपोर्टमध्ये व्यक्तीच्या फुफ्फुसांची अतिशय वाईट अवस्था पाहायला मिळत आहे. रुग्णांची फुफ्फुस पांढरी झाली आहेत, अशा दावा वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे केला जात आहे.

आधी रूग्णाच्या फुफ्फुसात हळूहळू बदल दिसून येत होतो. पण आता फुफ्फुस लवकर खराब होत आहेत, असं कोहिनूर रुग्णालयातील छातीरोग तज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचे एक्स-रे रिपोर्टमध्ये फुफ्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यातील बहुतेक रूग्ण वयोवृद्ध आणि कुठला ना कुठला आजार असणारे आहेत, असंही राजरतन सदावर्ते यांनी सांगितलं आहे.

अनेक लोक रत्यावर विना मास्क फिरत आहेत. फक्त लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना विषाणूचा प्रसार वाढतोय. मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदय आणि किडनीचे विकार असणाऱ्या रूग्णांना या कोरोनाचा धोका सर्वाधिक असल्याचं सदावर्ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

1 मार्चपासून शाळा बंद की चालू??? शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

दलालांमुळे आपल्या शेतकर्‍याची घुसमट होऊ नये अशी माझी इच्छा- नरेंद्र मोदी

तो आला, जामीन मिळवला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देत पुन्हा फरार झाला!

नराधमाने तब्बल 66 जणींवर केला बलात्कार, अशा पद्धतीने महिलांना ओढायचा आपल्या जाळ्यात!

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More