बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनोहर भोसले प्रकरणात नवी घडामोड, ‘त्या’ दोन जणांचा शोध सुरु!

सोलापूर | संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगत भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेला अटक झाली आहे. मनोहर भोसलेला अटक झाल्यावर त्याची अनेक प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. अशातच मनोहर भोसले आणि त्याच्या दोन साथीदारांवर बलात्कार केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता मनोहर भोसलेच्या दोन साथीदारांच्या शोधावर आहेत.

करमाळ्यातील आश्रमात मनोहर भोसले आणि त्याच्या दोन साथीदारांवर 2018 ला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या मनोहर भोसले बारामती आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात तुरूंगात शिक्षा भोगत आहे.

भोंदू बाबा मनोहर भोसलेनं बारामतीतील तरुणाची फसवणुक करत तब्बल 2 लाख 51 हजारांचा गंडा घातला होता. याप्रकरणी त्याला सातारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. मनोहरच्या अटकेनंतर बलात्कार प्रकरणी आता त्याच्या साथीदारांचाही शोध सुरु आहे.

दरम्यान, बारामती प्रकरणात मनोहर भोसलेची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यावर करमाळा पोलीस त्याला ताब्यात घेणार आहे. याशिवाय त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत असून पोलिसांना त्यांना पकडण्यात यश येतं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

देश जोडण्याबद्दल बोललं की लोकांना त्रास होतो- कंगणा राणावत

करुणा शर्मांना मोठा झटका, कोठडीतील मुक्काम 18 सप्टेंबरपर्यंत वाढला

कोरोनाची तिसरी लाट कधी येणार?, शास्त्रज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

…तेव्हा मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर आली होती- नितीन गडकरी

प्रविण दरेकरांच्या अडचणी वाढल्या?, गुन्हा दाखल होण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More