Top News क्राईम पुणे महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आल्यापासून ते गायब होते, मात्र आता ते समोर येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आज ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहेत, मात्र याच दरम्यान सोशल मीडियात एक मेसेज व्हायरल झाला असून त्यामुळे संजय राठोड यांच्याच अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार असल्याचं नक्की झाल्यानंतर बंजारा समाजाच्या व्हॉट्सअस ग्रुपवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक मेसेज फॉरवर्ड केला जात आहे. यामध्ये संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी पोहरादेवी येथे जमण्याचं आवाहन केलं जात आहे. एकाने दहा जणांना सोबत आणण्याचं आवाहनही यामध्ये आहे, ज्यामुळे संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी बंजारा समाजातील लोकांची हजारोची गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना पहायला मिळत आहे, राज्यातील काही शहरं तसेच जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यासह कडक पावलं उचलण्यात आली आहे, अशा परिस्थितीत संजय राठोड यांच्या समर्थनासाठी हजारोंची गर्दी जमल्यास व सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्यास त्याला जबाबदार कोण?, हा मोठा प्रश्नच आहे.

राठोड फक्त पोहरादेवीचं दर्शन घेऊन परत जाणार की आपल्याला समर्थन देणाऱ्या समाजाला याच ठिकाणी संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर गर्दी झालीच तर प्रशासन कारवाई करणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या-

आतुरता संपली; नवीन टाटा सफारी लाँच, किंमतही ठरली

कोरोना नियमांचं उल्लंघन, भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यातील ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण, अजित पवारांच्या बैठकीला होते उपस्थित!

‘…तर मला आज नातवंडे असती’; भाईजानने व्यक्त केल खंत!

शिवरायांच्या कन्येवरून भाजप-शिवसेनेत ‘ट्विट वॉर’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या