मुंबई | भारतीय पोस्टात (Indian Post) नोकरी (Government Job) मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. स्टाफ कार चालक या पदासाठी पोस्टात जागा (Recruitment) निघाल्या आहेत. त्यासाठी अर्ज करण्याचे शेवटेचे पाच दिवस उरले आहेत. यासाठी 10 वी पास (SSC) हा शिक्षणाची अट रहणार आहे. यासाठी उत्सुक आणि पात्र उमेदवारांनी भारतीय पोस्टाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (Website) अर्ज करायचा आहे.
indiapost.gov.in या संकेतस्थळावर 20 जुलैैपूर्वी अर्ज करायचे आहेत. याव्यतिरिक्त पात्र उमेदवार www.indiapost.gov.in/vas/Pages वर डायरेक्ट लिंकवर जाऊन या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या प्रक्रियेेत तब्बल 24 पदे भरली जाणार आहेत.
या भरतीसाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून 10 वी उत्तीर्ण असला पाहिजे. उमेदवाराचे वय अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंत वय 56 वर्षे पेक्षा अधिक असता कामा नये. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै आहे. एकूण 24 पदे भरली जाणार आहेत.
पात्र उमेदवाराने हा अर्ज भरुन वरिष्ठ व्यवस्थापक (जेएजी), मेल मोटर सेवा, क्रमांक 37, ग्रीम्स रोड, चेन्नई – 600 006 या पत्त्यावर पाठवायचा आहे.
थोडक्यात बातम्या –
“आज माईक ओढला, उद्या पॅन्ट ओढतील आणि तुम्हाला नागडं करतील”
“धर्मवीर आनंद दिघेंवर सिनेमा काढला, तो आवडला नाही, म्हणून…”
“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”
“मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री राज्याचा भार वाहत असताना राज्यपाल समुद्राच्या लाटा मोजतायत का?”
ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा
Comments are closed.