पुणे | ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे राज्यात आणखी 3 प्रवासी आढळले आहेत. तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे आहेत. यासह आता नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात एकूण 11 प्रवासी झाले आहेत. राज्यात आज 3729 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
आज नवीन 3350 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले. एकूण 18 लाख 56 हजार 109 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आलं. राज्यात एकूण 51 हजार 111 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.78 टक्के झाले आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी हा ड्राय रन घेण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.
थोडक्यात बातम्या-
ठाकरे सरकारची ही रोजचीच बोंबा बोंब आहे- देवेंद्र फडणवीस
मला महिलांच शरीर आवडतं, पण डोकं नाही- राम गोपाल वर्मा
नांदा सौख्यभरे! अखेर विधवा भावजयीसोबत लहान दिरानं बांधली लग्नगाठ!
“पीडित महिला संध्याकाळी घराबाहेर पडली नसती तर बलात्काराची घटना टळली असती?
कटकट बंद करा!; बिग बींच्या आवाजातील त्या काॅलरट्यूनविरोधात जनहित याचिका