बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीच मोडला शासनाचा आदेश

पुणे| एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचं सावट असताना. लोकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं असं सर्व माध्यमातून सांगितलं जात आहे. सरकारनं शाळा, कॉलेजेस, मॉल्स बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळांनीच शासनाचा आदेश मोडला आहे.

महाराष्ट्रात शाळा, महाविद्यालय, जलतरण तलाव, मॉल्स, व्यायामशाळा, नाट्यगृहे, सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र याच शासन निर्णयाला केराची टोपली दाखविण्याचं काम पुण्यातील हडपसर येथील ससाणे एज्युकेशन सोसायटी न्यू इंग्लिश स्कूलकडून करण्यात आलं आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी एका बाजूला राज्य सरकारनं शाळांना सुट्टी दिली आहे, तर दुसरीकडं आदेशाचं पालन न करता शाळेचं उद्घाटन केलं. ‘ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन दोन वेळा ठरले होते. मात्र काही कारणास्तव प्रत्येक वेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. याप्रकरणी आदेशाचं पालन न करणार्‍या संस्थाचालक, शिक्षक यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. मात्र राज्याच्या मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये भव्य असा कार्यक्रम घेतला गेला आहे.

दरम्यान, विद्यार्थ्याच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार झाला आहे. आता संबधित मंत्री आणि संस्था चालक यांच्यावर काय कारवाई केली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“विधान परिषेदसाठी माझी तयारी…फक्त पाटलांच्या निर्णयाची वाट पाहतोय”

“हा निर्णय म्हणजे आमचे हातपाय तोडले आणि आता पळायला सांगताय”

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात जमावबंदी लागू करण्याचा विचार- डॉ. दीपक म्हैसेकर

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला- जितेंद्र आव्हाड

माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर काळाच्या पडद्याआड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More