बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईची भाषा मराठीच; चंपक चाचाने मागितली जाहीर माफी

मुंबई | मुंबईची भाषा हिंदी असल्याचं ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत दाखवल्यानं वाद निर्माण झाल्यानंतर मालिकेतील अभिनेता अमित भट्ट यानं जाहीर माफी मागितली आहे.

मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारत आहे. अभिनय करत असताना लेखकानं दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असं माझ्याकडून चुकून बोललं गेलं आहे, असं अमित भट्ट याने म्हटलं आहे.

स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापुढं अशी चूक होणार नाही याची मी दखल घेईल, असंही अमितनं माफी मागताना म्हटलं आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेेय खोपकर यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला होता.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम आरक्षणाला विरोेध हे हिमताने सांगावं; फडवीसांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

सोशल मीडियावरील ‘त्या’ वादग्रस्त पोस्टमुळे केतकी चितळे वादाच्या भोवऱ्यात

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरचे विदुषकी खेळ थांबवावेत- राहुल गांधी

मुख्यमंत्रिपद जाताच देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं पुस्तक; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रकाशन

मोदींनी घेतलेल्या ‘त्या’ निर्णायाचं रोहित पवारांकडून कौतूक पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More