बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच; धनंजय मुंडेंचा विश्वास

मुंबई |  महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला ज्यांनी लुबाडलं त्यांनी आता ठरवलंय, भाजप-शिवसेनेला आता घरी बसवायचं. पुढचा मुख्यमंत्री भाजप-शिवसेनेचा नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच असणार, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

सत्ता असली म्हणून काय झालं? आंदोलनं करण्याचा हक्क आम्हाला घटनेने दिलाय. पोलिसांच्या मदतीने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

शेतकरी प्रश्नांवरून आक्रमक झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. पीक विमा कंपन्यांची कार्यालयं गेली 5 वर्षे मुंबईत आहेत, हे 5 वर्षांनी उद्धव ठाकरे यांना कळलं काय?, असा सवाल त्यांनी केला आहे.

सत्ताधारी पक्षावर धनंजय मुंडेंनी जोरदार तोफ डागत येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

-…तेव्हा मंत्रिपदाबाबत माझा नक्की विचार होईल- एकनाथ खडसे

-मोहम्मद शमीची हॅट्रीक मात्र प्लॅन मास्टरमाइंड धोनीचा!

-“भाजपने पळवापळवी करुन जे आमचे नेते पळवले हा सरळ सरळ भ्रष्टाचार”

-पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आम्हाला धमक्या देतात; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

-या काँग्रेस नेत्याच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश; सेनेची ताकद वाढणार??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More