महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत

नाशिक | पुढील विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेची निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका असून त्यानुसार तयारी सुरु असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. निवडणुकीत युती होईल असं सागणारे शिवसेनेचे प्रवक्ते नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

2014 साली तोडलेली युती 2019 ला व्हावी, असं भाजपला का वाटतंय, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

दरम्यान, जर मुख्यमंत्र्यांच्या अंगी दैवी शक्ती आहे तर राज्यातला दुष्काळाचा प्रश्न ते का सोडवत नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांच्या अंगी दैवी शक्ती आहे, असं गिरीश महाजन म्हणाले होते. 

महत्वाच्या बातम्या-

-राजस्थानही भाजपच्या हातून जाणार??? वसुंधरा घरी बसण्याची शक्यता

-भाजपसाठी धोक्याची घंटा; मध्यप्रदेशमध्ये सत्ता जाणार?

-नरेंद्र मोदी तुघलक तर योगी आदित्यनाथ औरंगजेब; काँग्रेसची टीका

-शरद पवारांच्या गाडीचं सारथ्य केलं चक्क त्यांच्या नातीनं

-50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच – सर्वोच्य न्यायालय