“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”

कोल्हापूर | पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार आहे, असे सूचक विधान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्रात काही कुटुंबे संस्थांच्या जोरावर काँग्रेसच्या काळात मोठी झाली, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी तपोवन मैदानाची सभेसाठी पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

सभा मोठी होण्यातून प्रभाव निर्माण होतो, हा एक भाग झाला. कर्तृत्वातून प्रभाव निर्माण होतो, हा दुसरा भाग झाला. उमेदवारीच कोणी घ्यायला तयार नाही, अशी आघाडीची स्थिती झाली, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय देवणे, संजय पवार, संदीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

महत्वाच्या बातम्या-

-उदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी

-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश

-नगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही! भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…

भाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच!