Top News देश

मी तुमचं काय अभिनंदन करू मला अभिनंदन करायचीही लाज वाटत आहे- नितीन गडकरी

नवी दिल्ली | केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नव्या इमारतीचं आज उद्घाटन करण्यात आलं. उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले. इमारतीच्या कामाला झालेल्या विलंबनामुळे गडकरींनी बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्वांनाच फैलावर घेतलं.

इमारतीचं पुर्ण झालेलं काम बघण्यासाठी  तीन सरकारं बदलून गेली. मग मी तुमचं काय अभिनंदन करू. मला अभिनंदन करायचीही लाज वाटतेय, असं म्हणत अशा शब्दात गडकरींना अधिकाऱ्यांना सुनावलं.

माझं नाव बदनाम झालंच आहे. मला रस्त्यांचं काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिकाऱ्यांना हाकलून लावलं. त्यांना सेवामुक्त केलं, हेच माझं उद्दिष्ट आहे. मला मंत्र्यांचे अधिकार माहिती असल्याचंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ज्या महान लोकांनी 2011 पासून 2020 पर्यंत हे काम केलंय त्यांचे फोटो या कार्यालयात लावण्याचा प्रयत्न करा, असा टोलाही गडकरींनी लगावला.

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांबाबत असं वक्तव्य करणं योग्य नाही- रोहित पवार

“शिवसेनेचं हिंदुत्व घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही, मग मित्राच्या पाठीत खंजीर खुपसणारं आहे का?”

4 वर्षांचा चिमुरडा पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये; तक्रार ऐकून पोलिसही हैराण

‘देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार कोरोनाची मोफत लस’; या केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधून बाहेर, साक्षी धोनीने लिहिली भावनिक पोस्ट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या