मुंबई | उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेर स्फोटकं सापडली होती. मनसुख हिरेन यांच्या मृत्युनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं. मनसुख हिरेन प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर होते. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी तब्बल 45 लाखांची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती राष्ट्रीय तपास एजन्सी म्हणजेच एनआयएने विशेष न्यायालयात दिली आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन हे प्रमुख साक्षीदार असल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याचं एनआयएने न्यायालयात म्हटलं आहे. एनआयएचे वकिल सुनील गोन्साल्विस यांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे.
संतोष शेलार, आनंद जाधव, रियाझ काझी, मनिष आणि सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन हत्येत सहभाग होता. तर सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं देखील एनआयएने न्यायालयात म्हटलं आहे. या प्रकरणात 4 ते 5 साक्षीदार असल्याचं एनआयएने सांगितलं आहे. जीवाचा धोका असल्यानं ते पुढे येत नाहीत, असा दावा एनआयएने न्यायालयात केला आहे.
दरम्यान, मनसुख हिरेनची हत्या झाल्यानंतर सचिन वाझे आणि प्रदिप शर्मा यांनी मारेकऱ्यांना रोख रक्कम दिली होती. त्यानंतर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त केल्याचं देखील एनआयएने सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
यो यो हनी सिंगच्या अडचणीत वाढ; पत्नीनं दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार
नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री
कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ; लहान मुलांना मोठ्या प्रमाणात संक्रमण
वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…- प्रविण दरेकर
‘माझ्या अंगावरून गाडी घाला’; पुण्यात भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा
Comments are closed.