मुंबई | शुक्रवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाची बैठक पार पडली. या बैठकीतला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मोबाईलमध्ये पाहत असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच फोटोवरून भाजप नेते निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईल मध्ये व्यस्त आहे, याला कोणी प्रोटोकॉल काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीचं गांभिर्य नाही, शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवलं, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
राज्यात कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव, कोरोनासंबंधी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना तसंच राहिलेल्या त्रुटी यासंबंधी राज्य सरकारची काल महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता उपस्थि होते.
दुसरीकडे 18 मे पासून महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातलं लॉकडाऊन सुरू होणार आहे. या चौथ्या लॉकडाऊनच्या काळात अर्व्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणते भाग सुरू करायचे आणि काय बंद ठेवावायं, यावर देखील प्रशासनाच्या पातळीवर महत्त्वाची चर्चा झाली.
निलेश राणे आदित्य ठाकरेंना लक्ष्य करताना आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईल मध्ये व्यस्त आहे, याला कोणी protocol काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवलं”.
कोरोना संदर्भात मीटिंग चालू असताना कोपऱ्यात एका बाजूला आदित्य ठाकरे मोबाईल मध्ये व्यस्त आहे, याला कोणी protocol काय असतो तो सांगा. कोणत्याही गोष्टीच गांभिर्य नाही शेवटी बालिश बुद्धी आहे हे परत सिद्ध करून दाखवल. pic.twitter.com/KZJ1TUEbeW
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
“ठाकरे सरकार जेवढा खिळखिळं करण्याचा प्रयत्न कराल, तेवढं हे सरकार मजबूत आणि गतीमान होईल”
“खडसे, पंकजा, बावनकुळे तावडे यांच्या भूकंपातून नवी वाट पेटू नये म्हणून भाजपने सावध राहावं”
महत्वाच्या बातम्या-
मोदी माझे चांगले मित्र, भारताला व्हेंटिलेटर पाठवणार- डोनाल्ड ट्रम्प
LOCKDOWN- 4 : पाहा कसा असेल महाराष्ट्रातलं चौथं लॉकडाऊन…
स्थलांतरित मजुरांच्या जागी स्थानिक भूमीपुत्रांना नेमा- उद्योगमंत्री सुभाष देसाई
Comments are closed.