बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जास्त हवेत उडायचं नसतं, मलिकांनी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. नवाब मलिकांनी वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी मलिक यांच्याविरूद्ध मानहाणीचा खटला दाखल केला होता. त्यावेळी आदेशाचं पालन न केल्यानं मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नवाब मलिकांना खडसावलं होतं.

न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अवमान कारवाई का करू नये? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली होती. त्यावर मलिकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. परंतु आपण न्यायालयाची बिनशर्त माफी मागतो, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. त्यावर आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कडाडून टीका केली आहे.

“जास्त हवेत उडायचं नसतं, ड्रग माफियाला वाचवायला हाच मलिक कारणीभूत आहे, त्या बदल्यात एका अधिकाऱ्याला आणि त्यांच्या कुटुंबाला उध्वस्त करण्याचं कारस्थान घडवून मलिक यानी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली. एका ड्रग्ज ॲडिक्टसाठी मलिक इतका पिसाळला होता की सांगून सोय नाही”, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं असून शुक्रवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता मलिकांच्या अडचणी वाढणार का? याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

पाहा ट्विट-


थोडक्यात बातम्या-

भाजपने नितेश राणेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

ये रिश्ता क्या कहलाता है?; सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टची सोशल मीडियावर तुफान चर्चा

कोविशील्ड लस घेतली का?, ‘त्या’ अहवालानं वाढवली भारतीयांची चिंता

“माझ्यावर दबाव आणण्यासाठी माझ्या भावाला…”, गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

“त्यांच्यावर जबाबदारी देऊन पाहिलंय…”, अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More