मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) हल्ला केल्यानंतर राज्यात जोरदार वाद पेटला आहे. महाविकास आघाडीतील मंत्री आणि भाजप नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशातच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी (BJP Leader Nilesh Rane) पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
एकही काच फुटली नाही किंवा घराचं नुकसान झालं नाही तरी राज्याचे गृहमंत्री आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पवार साहेबांच्या घरी पोहोचले. पोलीस अधिकारी घरात जाऊन तपासा बद्दल माहिती देण्यासाठी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला विकत घेतले आहे का?, असा सवाल राणेंनी केला आहे.
पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?, असं देखील वक्तव्य निलेश राणेंनी केलं आहे. परिणामी राज्यात पवारांवरील हल्ल्यानंतर राजकीय वाद वाढला आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामागं कोण होतं याचा शोध मुंबई पोलीस घेत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पवारांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. पण काही भाजप नेत्यांनी पवारांवर टीकेची झोड कायम ठेवली आहे.
थोडक्यात बातम्या –
गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नीने शरद पवारांवर केलेल्या आरोपाने खळबळ
“शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”
18 वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार बूस्टर डोस, मोजावे लागणार ‘इतके’ रूपये
पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त 100 रूपयांपासून करू शकता गुंतवणूक
‘अस्वस्थ, अशांत, अतृप्त आत्मे’, शरद पवारांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Comments are closed.