बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल”

मुंबई | अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या विधानपरिषद (MLC) निवडणुकांचे निकाल (Results) हाती आले आहेत. मोठ्या गाजावाजात महाविकास आघाडी सरकारनं (MVA Government) या निवडणुकीत आपली ताकद पणाला लावली होती. पण भाजपनं (BJP) महाविकास आघाडीला दणका दिला आहे. शिवसेनेनं (Shivsena) तर आपल्या हक्काची जागा गमावली आहे. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (BJP Leader Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अकोला विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया यांचा तब्बल 109 मतांनी पराभव  झाला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी तीनवेळच्या आमदाराला पराभवाची धुळ चारली आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. आपल्या हक्काची मत फुटल्यानं आणि महाविकास आघाडीची साथ असूनही पराभव झाल्यानं शिवसेनेवर टीका होत आहे.

निलेश राणे यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बहुमत असून पण शिवसेना उमेदवाराचा दारूण पराभव झाला. मित्रपक्षांनी दगा दिला आणि म्हणे 25 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. कोण कोणाला सडवतोय आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे. परिणामी सध्या सर्वत्र शिवसेनेचा पराभव कोणत्या कारणानं झाला याची कारणीमिमांसा चालू आहे.

दरम्यान, अकोला-बुलडाणा-वाशिम विधानपरिषद मतदारसंघात गेल्या चार टर्ममध्ये शिवसेनेचा उमेदवार विजयी होत होता. विशेष म्हणजे बहुमत नसताना शिवसेना या मतदारसंघात विजयी होत होती. पण यावेळी गणित नेमकं चुकलं कुठं हा सवाल आता शिवसेनेला देखील पडला आहे.

थोडक्यात बातम्या 

भाजपच्या 12 आमदारांना मोठा झटका! सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

‘हा तर घोडेबाजार’; नागपूरातील पराभवानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

MLC Election: देवेंद्र फडणवीसांना मिठी मारताच बावनकुळे यांना अश्रू अनावर

‘रडीचा डाव खेळू नका, आता… ‘; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान

‘विनोदवीर नाना पटोलेंचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालंय’; भाजपचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More