बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्रं भिक घालणार नाही”

मुंबई | केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. तर मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. सामना अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. तर आता भाजप नेेते निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपला देश लोकशाहीच्या प्रक्रियेतून बाहेर पडून संपूर्ण खासगीकरणाच्या जोखडात जात असल्याचा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला होता. तर आता यानंतर निलेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकेचे बाण सोडले आहेत. सत्तेचा वापर करून एका महिलेला छळणारा देशाच्या पंतप्रधानांवर बोलतो, ह्यापेक्षा मोठं दुर्भाग्य काय?, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.

“संज्या” किती जरी शेती कायद्यांचा विषय घेऊन नाचलास तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्रं भिक घालणार नाही, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. तर देशाच्या स्वातंत्र्यावर असं बोलतो जसं ह्याच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, अशी टीकाही निलेश राणे यांनी संजय राऊतांना उद्देशून केली आहे. मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं, सात वर्षांनंतर पंतप्रधान मोदी झुकले, अशा अनेक टीका सध्या केल्या जात आहेत. राजकीय वर्तुळात सध्या अनेक शाब्दिक वाद रंगत असताना दिसत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

‘माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नाही!’ तरूणीच्या अजब तक्रारीनंतर पोलिसांनी केलं असं काही की…

“जेवढ्या टाळ्या वीर दाससाठी वाजल्या तेवढेच चाबकाचे फटके त्याला दिले पाहिजेत”

“‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांच्या कौतुकाचे ट्विट करावे”

काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसमधील ‘हे’ तीन मंत्री देणार राजीनामा

Netflix वापरताना मोबाईल डेटा संपतोय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि मोबाईल डेटा वाचवा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More