बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“धनंजय मुंडेंनी काय देऊन प्रकरण सेट केलं हे त्यांनाच ठाऊक”

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सध्या शिवसेना मंंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जात आहे. याआधी सरकारमधील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही बलात्काराचे आरोप झाले होते. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी धनंजय मुडेेंवर निशाणा साधला आहे.

धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर झालेल्या बलात्काराचं आरोप प्रकरण काहीतरी देऊन  सेटल केलं. त्यांनी त्यासाठी काय दिलं हे त्यांनाच टाऊक असं म्हणत निलेश राणेंनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.  टीव्ही9 मराठी या वाहिनीशी ते बोलत होते. याआधी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

मंत्री गुन्हा करतात आणि स्वत:ला क्लीन चीट देऊनचीट देतात. ठाकरे सरकारच्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांनी मनोहर जोशी यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्रीपदावरून काढलं. पण उद्धव ठाकरे यांच्यात तशी धमक नाही, असं म्हणत निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

दरम्यान, ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘, अशा तिखट शब्दात निलेश राणेंनी टीका केली.

थोडक्यात बातम्या-

कोरोना गेला खड्ड्यात! संभाजी भिडेंनी आमदारालाच काढायला लावला मास्क!

शिवाजी पार्कवरून काका पुतण्या आमने-सामने; वाचा काय आहे प्रकरण

इंदापूर तालुक्यातील जवान लक्ष्मण डोईफोडेंना आसाममध्ये वीरमरण!

मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले, त्यामुळे…- चित्रा वाघ

“मी मर्द आहे हे उद्धव ठाकरेंनी परत कधीही म्हणू नये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More