बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मंत्रालयातील सर्व बाटल्या संजय राऊतांनीच मोकळ्या केल्या, त्यामुळे…”; निलेश राणेंची जहरी टीका

मुंबई | मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्यांवरून राजकीय वातावरण पेटताना दिसत आहे. मंत्रालयात दारूच्या सापडलेल्या बाटल्यांवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. भाजपने सापडलेल्या बाटल्या कधीच्या आहेत हे पाहण्यासाठी लॅबला पाठवाव्यात, असं संजय राऊत म्हणाले होते. मात्र यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राऊतांवर जहरी टीका केली आहे.

संजय राऊतांचं हे वक्तव्य बघून असं वाटतं त्या सगळ्या बाटल्या संजय राऊत यांनी मोकळ्या केल्या असाव्यात आणि त्यानंतर मीडियासमोर आले. कारण रिकाम्या बाटल्या तपासण्याचं लॅब असतं हे आज कळलं, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकार आल्यापासून मंत्रालयाची आतून सफाई दीड वर्षांनी झाली नाही की काय?, असा सवालही निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर काय अगरबत्तीचा स्टॉक मिळणार??, मंत्रालयात कुठल्या स्तराचं काम चालू आहे यावरून लक्षात येतं असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निलेश राणे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

‘तुमची इयत्ता कंची ?’; आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल

सीमाभागातील गावे तात्काळ महाराष्ट्रात सामील करण्यात यावीत; अजित पवारांचं पंतप्रधानांना पत्र

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून संसदेत केंद्राचा ‘यु-टर्न’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More