Top News महाराष्ट्र मुंबई

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

मुंबई | उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधतात. यामध्ये भाजप नेते निलेश राणे त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मराठी हिंदी मिक्स भाषण… भाषेचं सोडा या मुख्यमंत्र्याला काहीच धड येत नाही. पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही, तुम्हाला ही पश्चाताप होत असेल. लोकं राहुल गांधीला विसरले जेव्हापासून पवारसाहेबांनी हा कॅरेक्टर बाहेर काढलं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.

निलेश राणेंनी या संदर्भात ट्विट केलं असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा एका व्हिडीओ पोस्ट केला आहे.  व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एका कार्यक्रमात बोलतान दिसत आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे मराठी आणि हिंदी भाषेमध्ये बोलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये भाषण केल्यामुळे राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंना 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा”

‘आपल्याला शिवसेनेबरोबर कायम रहायचंय त्यामुळे…’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना

‘मी भाजपमध्ये प्रवेश केला असता तर…’; मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात देखील नाईट कर्फ्यूची घोषणा!

“ज्यांच्या राजकारणाचं दुकान घराणेशाहीच्या खांबावर उभं आहे त्यांनी संघराज्य, लोकशाहीवर न बोललेलं बर”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या