मुंबई | एकदा नाही 100 वेळा काढू… ह्या डांबर चोरात हिम्मत किती आहे ते आम्हाला माहीत आहे. 2014 मध्ये झालेला शिवसैनिक फुसके बार सोडतोय. सांगा कुठे यायचं??, असं प्रत्युत्तर भाजप नेते निलेश राणे यांनी तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना दिलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
पुन्हा बाप काढाल तर याद राखा, आम्ही आधी शिवसैनिक आहोत मग मंत्री, शिवसेनेला प्रतिकार कसा करावा हे सांगावं लागत नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना इशारा दिला होता.
आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली होती. हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
दरम्यान, मी व्यक्तीगत कुणाचा उल्लेख केलेला नाही. मात्र तरीही जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो, असं स्पष्टीकरण शेलारांनी दिलं आहे.
एकदा नाही १०० वेळा काडू… ह्या डांबर चोरात हिम्मत किती आहे ते आम्हाला माहीत आहे. २०१४ मध्ये झालेला शिवसैनिक फुसके बार सोडतोय. वैभव ह्याला विचार कुठे यायचं?? https://t.co/6YZdeGleGv
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 3, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
संभाजी राजेंची मालिका संपताना अमोल कोल्हे भावूक…. केला हा खास व्हिडीओ ट्विट!
‘अरे तुझ्या बापाचं राज्य आहे का?’; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शेलारांची जीभ घसरली
महत्वाच्या बातम्या-
“संजय राऊतांनी घेतलेली मुलाखत म्हणजे ‘अनैसर्गिक आघाडी’चा खुलासा करणारी”
‘आम्ही गुजरातमध्ये बापाचा शोध घेत नाही’; शेलारांच्या वक्तव्याचा आव्हाडांकडून समाचार
मी दोन भावांच्या कात्रीत सापडलो होतो- उद्धव ठाकरे
Comments are closed.