बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला, महाराष्ट्राला जास्त सतर्क रहायला हवं”

मुंबई | अफगाणिस्तानचं भविष्य आता तालिबानच्या हातात आहे. 20 वर्ष युद्ध करून तालिबानने शेवटी अफगाणिस्तानवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रध्यक्ष गनी यांनी देश सोडून पलायन केलं आहे. एकंदरित अफगाणिस्तान देशावर पुर्णपणे तालिबान्याचं नियंत्रण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्राला जास्त सतर्क राहणं गरजेचं आहे. तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतला ही बाब भारतासाठी चांगली नाही. अनेक चर्चा होतात की मुंबईत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल्स आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी तातडीने आणि गंभीरतेने हा विषय हाताळावा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

नाहीतर सांगतील केंद्राने कळवळं नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, तालिबानने हस्तगत केलेल्या अफगाणिस्तानबाबत बोलताना भारताची प्रतिक्रिया आली आहे. भारत आणि अफगाणमधील भागीदारांच्या मागे भारत उभा राहिल आणि भारताच्या हिताचं रक्षण केलं जाईल, असं परराष्ट्र खात्याने म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

अबब… गाड्या विकता की केसावर फुगे??? ‘या’ कंपनीनं एका दिवसात विकल्या 1 लाख गाड्या!

होंडाचा सर्वात मोठा धमाका, सर्वात स्वस्त कार होणार लाँच, फक्त 5 हजार रुपयात!

मोठी बातमी! सुवर्णपदकवीर नीरज चोप्रा रूग्णालयात दाखल, तब्येत पुन्हा बिघडली!

‘नवरा मुर्ख वाटायला लागतो’, पाहा भन्नाट मराठी कविता

देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More