बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या भाषणाच्या संग्रहाचं पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तक प्रकाशनाला शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी आपल्या भाषणानं चांगलीच रंगत आणली होती. आता यावरूनच भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपल्या खास शैलित राऊत यांच्यावर टीका केली आहे.

पवार साहेब गेली 25 वर्ष झालं भाजपच्या विरोधात लढत आहेत. मात्र आम्हाल हे गेल्या 2 वर्षात कळालं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. पवार साहेब 25 वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापूर्वी कळू लागलं, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू.. संज्या निघाला, अशी जहरी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

इतकच नाही तर राणे यांनी राऊत यांच्यावर बाळासाहेब यांचा दाखला देत टीका केली. स्वा. बाळासाहेब असते तर संज्याला लाथ मारून हाकलून दिलं असतं कारण 25 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला. निलेश राणे हे संजय राऊत यांना ऐकेरी नावानं हाक मारतात. यावेळी टीक करतानाही त्यानी ऐकेरी उल्लेख करत टीका केली आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भाषणाच्या पुस्तक प्रकाशनावेळी पवार यांची भरपुर स्तुती केली आहे. पवार यांच्या पुस्तकाच्या भगव्या रंगावरून राऊत यांनी जोरदार बॅटींग केली आहे. निलेश राणे यांच्या या टीकेवर आता संजय राऊत काय उत्तर देतात ते पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थो़डक्यात बातम्या 

वाद तिरंगा रॅलीचा; सरकार आणि एमआयएममध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी एका क्लिकवर

भारती म्हणते, ‘Are We Positive?’; व्हिडीओ शेअर करत दिली गुड न्यूज

“…तर आपल्यालाच सरकारी पाहुणे बनावे लागेल”, नवाब मलिकांना खोचक टोला

“जास्त हवेत उडायचं नसतं, मलिकांनी स्वतःची प्रतिमा भंगारात मिसळली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More