मुंबई | नीरव मोदी याच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचे पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत.
मुंबईत स्थापन करण्यात आलेल्या विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीकडून नीरव मोदीविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे.
नीरव मोदीची बहीण पूर्वी मेहता आणि तिचे पती मयंक मेहता यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त झालं असून, आता नीरवपासून दूर राहायचं आहे. यासह नीरव मोदी प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे सादर करू शकतो, असं या दोघांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आलं.
नीरव मोदीच्या कथित गुन्हेगारी कृत्यांमुळे आमच्या दोघांचेही खासगी आणि व्यवसायिक जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे, असं मेहता यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
पोर्तुगालमध्ये Pfizer ची लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू!
“अंबानी, अदानी हे दोन उद्योगसमूह शेतीच्या ठेकेदारीत घुसतील आणि भविष्यात शेतकरी भिकेला लागेल”
“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”
MPSC, UPSC परीक्षांसदर्भात महत्त्वाची बातमी, वाचा सविस्तर माहिती
“मतदारवर्ग घसरल्याने शिवसेनेला खमंग ढोकळ्याची आठवण”