नाशिक | इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित काँग्रेसचा हात झिडकारून आपल्या हातात शिवबंधन बांधणार आहेत. उद्या त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असं वृत्त ‘दै. सकाळ’ने दिलं आहे. उद्या दुपारी 4 वाजता त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
निर्मला गावित अगोदर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता हातात शिवबंधन बांधण्याचं ठरवलं आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची महाराष्ट्रासह देशात अत्यंत दयनीय अवस्था झाली. मोदी-शहांचा विजयरथ काँग्रेस रोखू शकलं नाही. लोकसभेचा निकाल लागल्यापासून महाराष्ट्रात पक्षांतराचं जोरदार वारं वाहत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक आमदार सत्ताधारी भाजप-सेनेत प्रवेश करत आहेत.
दरम्यान, गावित यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बाहेरच्या नेतृत्वाला नगरमध्ये ‘नो एन्ट्री’; विखे-पाटलांचा रोहित पवारांना इशारा
-स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाची भीक नको; संभाजीराजेंनी तावडेंना सुनावलं
-“भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो”
-आमच्या हातात सत्ता द्या… स्थानिकांना 75 टक्के रोजगार देतो- अजित पवार
-दोषी नसाल तर घाबरू नका… चौकशीला बिनधास्त सामोरे जा; तावडेंचा राज यांना सल्ला
Comments are closed.