बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?, निर्मला सीतारामन यांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली |  वाढत्या कोरोना रूग्णांचा आकडा पाहता देशात लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत असली तरी व्यापक पातळीवर लॉकडाऊन लावण्याची केंद्र सरकारची कुठलीही योजना नाही आहे, असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्हाला अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प करायची नाही आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे आता संपूर्ण देश लॉक होणार नाही. तर कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर नियंत्रणासाठी विशेष पावले उचलली जातील. कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना वेगळे ठेवण्याबाबत उपाय केले जातील. स्थानिक पातळीवरील उपायांमधून संकटाचा सामना केला जाईल. मात्र लॉकडाऊन लावलं जाणार नाही, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग प्रचंड वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाकाळात नोकरी गेल्याने पती झाला मेल सेक्स वर्कर, पत्नीला समजताच तिने…

खळबळजनक! भररस्त्यात सोनसाखळी चोराने आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेलं

उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे धावले; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘या’ लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; समोर आलीय ही धक्कादायक माहिती

खुशखबर! यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार, सरासरीच्या 103 टक्के पाऊस होणार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More