बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पवार महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेत”

मुंबई | राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहेे. अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन हे वातावरण पेटलं आहे. अशातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मलिकांच्या राजीनाम्यावरुन मोर्चे सुरु असून यामागचा महत्त्वाचा हेतू काय आहे, हे नितेश राणेंनी खोचक शब्दांत सांगितलं आहे. आपल्याला विधानसभेत बसलेले महाविकास आघाडीचे सगळे मंत्री, घरातून न निघालेले मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत संदेश पोहोचवायचा आहे. तुम्ही आमच्या मुंबईकडे वाकड्या नजरेने पहाल, तर भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला फिरु देणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

आझाद मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढून भाजपनं आज मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. यामुळे वातावरण चांगलंच तापलं असून भाजप आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

दरम्यान, भाजपच्या या आक्रमकपणापुढे ठाकरे सरकार काय निर्णय घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“मलिकांविरोधात ईडीजवळ पुरावे, दाऊदच्या माणसाचा राजीनामा घेतलाच पाहिजे”

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात

“आज माझा विधिमंडळात होता फेर फटका, कारण मला द्यायचा आहे महाविकास आघाडीला झटका”

“शरद पवारांनी वर्षानुवर्ष केलेल्या कारस्थानामुळे आज महाराष्ट्र भोगतोय”

“सरकार आणखी खोलाशी जाईल आणि दुसरा पेनड्राईव्ह घेऊन समोर येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More