मुंबई | गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गचा दौरा करून दिल्लीत गेले पोहोचत नाहीत तर शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना शिवसेनला व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं असल्याचं म्हटलं आहे.
वैभववाडी नगरपंचायतीत 17 पैकी 17 नगरसेवक भाजपचे असून त्यातील सात नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले नगरसेवक शिवसेनेमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबतच भाजपचे काही पदाधिकारीही रामराम ठोकला आहे.
शिवसेना हे आमचं जुनं प्रेम आहे, त्यामुळे भाजपमधून जात असलेले सात नगरसेवक ही आमच्याकडून शिवसेनेला व्हॅलेंटाईनची भेट असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नगरपंचायतीची निवडणुक जवळ येत आहे. त्याआधी भाजपचे सात नगरसेवक आणि काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम टोकल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.
Dear Uddhavji,
Happy Valentines Day !Love : Nitesh Narayan Rane 😅 pic.twitter.com/BOEiAnmBMq
— nitesh rane (@NiteshNRane) February 9, 2021
थोडक्यात बातम्या-
बॅालिवूड सिनेसृष्टीला आणखी एक धक्का; ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं दुख:द निधन
‘तुम्ही भाषा बदलली नाही तर…’; निलेश राणेंचा राऊतांना इशारा
“मंगेशकर असोत की तेंडुलकर, सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे”
‘याला चिंधी बाजार म्हणतात साहेब’, निलेश राणेंचं अजित पवारांवर टीकास्त्र
पंतप्रधान मोदी आम्हाला घाबारतात, हे त्यांना शोभत नाही- योगेंद्र यादव