‘युवराजांना पेंग्विन म्हणताना…’, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख न करता चांगलीच टोलेबाजी केली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना पंचेचाळीसपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना तिकीट देणार नसल्याची छुपी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. त्यामुळे मुंबईतील अनेक विद्यमान नगरसेवक नाराज असल्याचं नितेश राणे म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या याच घोषणेमुळे युवराजांना पेंग्विन म्हणतात असे स्वत:च जाहीर करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर उत्साहात दिसत होत्या, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. तर शिवसेनेतील अंतर्गत दुफळी स्पष्ट दिसत असल्याची टीकाही राणेंनी केली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या आतील गोटातूनच आदित्यला लगाम घालण्याचा प्रयत्न होत आहे. राजकीय स्वार्थासाठी का होईना पण मुंबईच्या महापौर खरे बोलत आहेत. त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
नवाब मलिकांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन
“नवाब का ‘नक़ाब’ उतरेगा और मलिक का ‘मालिक’ बेनक़ाब होगा”
‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’, भाजपचा हल्लाबोल
“भाजपने स्वतःचा ईडी चालवायला माणूस ठेवला असेल”
“प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल, आता हौतात्म्य आलं तरी चालेल”
Comments are closed.