बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘म्याँव म्याँवचा आवाज ऐकायला येत नाहीये भाई…’, नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

मुंबई | देशाच्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. (Assembly Election Result 2022) या पाच राज्यातील निकाल आता हाती यायला सुरूवात झाली आहे. गोवा विधानसभेत काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे तर उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपचा बोलबाला असल्याचं चित्र दिसत आहे.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यातील (Goa) निकालावरून महाराष्ट्रात चांगलंच राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) संपूर्ण ताकदीने यंदाच्या गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र, या निवडणुकीत सेना-राष्ट्रवादीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला.

या निकालांवरून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सेना-राष्ट्रवादीला डिवचलं आहे. गोव्यात आणि उत्तर प्रदेशात म्याँव म्याँवचा आवाज ऐकायला येत नाहीये भाई. अतिशय दु:खी. खुप वाईट वाटलं, असा टोला नितेश राणेंनी ट्विट करत लगावला आहे.

दरम्यान, निवडणुक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार गोव्यात भाजपला 33.60% मतं मिळाली आहे. तर शिवसेनेला 0.25% आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1.06% मतं मिळाल्याचं समोर आलं आहे. पाचही राज्यातील संपूर्ण चित्र काही तासांत स्पष्ट होईल.

 

थोडक्यात बातम्या-

“2024 मध्ये आम्ही महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, तर जनताच….”

गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा ‘नोटा’ला जास्त मतं

“…अन् आता आम्ही थांबणार नाही, लोकसभाही लढू”

“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”

मोठी बातमी! निवडणूक निकालांचे पडसाद शेअर बाजारावर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More