उज्ज्वल निकम यांना महाराष्ट्र भूषण द्यावा; नितेश राणेंची मागणी

मुंबई | कोपर्डीच्या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करावा, अशी मागणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केलीय. 

कोपर्डीच्या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा झाल्याने आमच्या ताईला न्याय मिळाला याचं आम्हा सगळ्यांना समाधान आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. 

भविष्यात अशी कुठलीही घटना कुणासोबतही घडू नये, असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण करणं गरजेचं आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.