नारायण राणे संपले नाहीत अजून; विरोधकांनी लक्षात घ्यावं!

सिंधुदुर्ग | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

पवार आणि राणेंची भेट झाल्यानंतर नारायण राणे हे संपले नाहीत. हे विरोधकांनी लक्षात घ्यावे, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. नारायण राणे काय आहेत हे शरद पवारांना पण माहित आहे, असंही नितेश राणेंनी म्हटलं.

आजही राजकिय वर्तुळात नारायण राणेंचं वजन पुर्वीसारखंच आहे, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं. 

दरम्यान, नारायण राणेंची राजकारणातील कारकिर्द संपल्याची टीका अनेकदा विरोधकांनी केली आहे. त्यामुळे नितेश राणेंनी विरोधकांना असं उत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या-

-धनगर आरक्षणासाठी भाजप खासदार रस्त्यावर; जाळला महायुतीचा वचननामा!

-मराठा आरक्षणाविरोधात याचिका हा तर विरोधकांचा डाव!

-माजलगावच्या वादग्रस्त DYSP भाग्यश्री नवटकेंवर अखेर कारवाई

-खासदार सुप्रिया सुळे यांना ‘श्रेष्ठ सांसद’ पुरस्कार जाहीर

-समोरच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी चक्क घुबडांचा वापर!

-चक्क पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेलं घरच गेलं चोरीला!