बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही, आता ते कलेक्शन ऑफिस झालंय”

मुंबई | मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नसून मुंबई आमचीही आहे, असं म्हणत भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. आज माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं प्रसाद लाड आणि नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नितेश राणे बोलत होते.

आम्ही आमच्या निवडणुकीची तयारी असो किंव कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम असो त्यासाठीची आमची ही तयारी आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेनेचं नाव लिहिलेलं नसून मुंबई आमचीही आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे, अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

दरम्यान, शिवसेनेला वाटत की आम्ही माहीम मध्ये आल्यावर सेनाभवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसाद लाड यांनी याच कार्यक्रमात बोलताना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘लोकांनी गोमांस अधिक खायला हवं’; ‘या’ भाजप मंत्र्याचं वक्तव्य

“तू आमदारकीचा राजीनामा दे आणि निवडणूक लढ, शिवसैनिक तुझं थोबाड फोडतील”

मन सुन्न करणारी घटना; आजीच्या दशक्रिया विधीदिवशीच नातवांचाही मृत्यू!

“देशातील हर एक चौथा मुसलमान भिकारी आहे , ही माहिती अस्वस्थ करणारी”

“अजित पवार साहेब तुम्ही लॉलीपॉप बनवायची फॅक्टरी टाका, शोभेल तुम्हाला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More