बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“स्वतःच्या बुडाखाली काय जळतं ते बघा, मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले?”

मुंबई | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून भूपेंद्र पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापलेलं दिसत आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून गुजरात विकासाच्या मार्गावर होतं तर मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, असा सवाल केला होता. यावर आता भाजपकडून राऊतांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

गुजरात मॉडेलच सोडा, तुम्ही ऐन कोरोना काळात मुंबई पालिका आयुक्त परदेशी का बदलले ते सांगा?, तुमचं ते मुंबई मॉडेलचे काय चाटायचं आम्ही??, स्वतःच्या बुडाखाली काय जळतं आहे ते आधी बघा, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

लोकशाहीचं, राज्यकारभाराचं आणि विकासाचं गुजरात मॉडेल अशा प्रकारे फुगा फुटावा तसं टपकन फुटलं आहे. गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होतं, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा करत सवाल संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला होता.

दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावं लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचं ते हेच काय?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्राला तालावर नाचवणाऱ्या ‘शांताबाई’ फेम गायकाची राजकारणात एन्ट्री, ‘या’ पक्षात करणार प्रवेश!

कोरोनामुळे तरुणांच्या फुफ्फुसांवर परिणाम???, संशोधनातून महत्वाची माहिती समोर!

“मोदी सर्वोच्च न्यायालयाचं पण ऐकणार नाहीत मग कोणाचं ऐकणार आहेत?”

महाविद्यालयीन अभ्यासक्रमात आता महाभारत, रामायणाचे धडे, शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!

“सरकार त्यांच्या विचारांचं समर्थन करणाऱ्या चित्रपटांना क्लीनचीट देतं, नाझी जर्मनीत हेच व्हायचं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More