मुंबई | औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने सांगून टाकलं संभाजीनगर होणार नाही! आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!, संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
नाव बदलण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. नाव बदल करून काही होऊ शकत नाही. विकास कसा करता येईल हे महत्त्वाचं आहे. शिवाय असा प्रस्ताव शिवसेना आणणार नसल्याची मला खात्री असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2020
थोडक्यात बातम्या-
“छत्रपतींचा महाराष्ट्र फक्त भाषणात नको कृतीत दाखवा, महिला सुरक्षा फक्त घोषणेपुरती”
बनावट कागदपत्र, आधार कार्ड, बनवत योगींच्या राज्यात पाकिस्तानी महिला झाली सरपंच
“गौरी तू ज्यामुळे हा निर्णय घेतला त्यांना नक्की शिक्षा मिळणार; कुणी रक्ताचं असलं तरी”
“काँग्रेस पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस वाळवी सारखं पोखरतोय”
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण करण्यास काँग्रेसचा विरोध- बाळासाहेब थोरात