बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मागच्या मुख्यमंत्र्यांनी नाक्यावरची भाषणं आणि टोमणे मारण्यापलीकडे काही केलं नाही”

मुंबई | विधानसभेत सुरु असलेल्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात सध्या मोठ्या राजकीय गोष्टी घडत आहेत. काल (03 जुलै) रोजी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजप आणि शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांनी 164 मतांसह विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचे राजन साळवी 107 मते मिळाली.

आज (4 जुलै) विश्वासदर्शक प्रस्ताव म्हणजे बहुमत चाचणी पार पडली. त्यात देखील सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचा विजय झाला. भाजपला 164 तर महाविकास आघाडीला 99 मते मिळाली. तीन आमदारांनी तटस्थ मत दिले. आणि भाजप आणि शिंदे गट आज अधिकृतरित्या सत्तेत बसला.

भाजपचे आमदार निलेश राणे यांनी आता ट्विट करत या परिस्थिवर भाष्य करत महाविकास आघाडी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, आज मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकून कोणाच्या मनामध्ये शंका राहिली नाही की महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल. मुख्यमंत्री कसा असावा हे आज महाराष्ट्राने बघितलं. मागच्या मुख्यमंत्र्यानेे अडीच वर्षात फक्त नाक्यावरची भाषणे व टोमणे मारण्यापलीकडे काही केले नाही, असा घणाघात निलेश राणेंनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बहुमत चाचणी प्रस्तावावर भाषण केले. त्यांनी त्यात त्यांच्या शिवसेनेच्या जडणघडणीतील आठवणी सांगितल्या. तसेच आपणच बाळासाहेबांनी सांगितलेल्या आणि दिलेल्या मार्गावर चाललो आहोत असे सांगितले. बाळासाहेबांनी शिवसेनेला काँग्रेससोबत न जाण्याचा सल्ला दिला होता तो आज आपण पाळला, असंही शिंदे म्हणाले. तसेच आता महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वपनातले सरकार आले असेही ते म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार बोलतात त्याच्या नेहमी उलट होतं, त्यामुळे…”

‘…ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र’, फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

‘दाल मे कुछ काला है, 106 आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यंमंत्री होत नाही म्हणजे काय?’

‘…तर शिंदे साहेब महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल’, शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य

‘… तर नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होईल’ -देवेंद्र फडणवीस

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More