बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही’; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | राज्याच्या विकासाच्यादृष्टीनं धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य विधीमंडळ अधिवेशन घेण्यात येतं. सरकार आणि विरोधक यांच्यात या माध्यमातून चर्चेद्वारे प्रश्न सुटणं अपेक्षित असतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसल्यानं राज्य विधीमंडळ अधिवेशनात ते उपस्थित राहतील का हे स्पष्ट नाही. परिणामी भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील जनतेचे हाल होत आहेत. राज्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तरीही सरकार काहीच करत नाही. जनता खड्यातून मार्ग काढते तर राजासाठी गुळगुळीत रस्ते बनवण्यात येत आहेत. आम्ही जेव्हा रस्त्यासाठी निधी मागतो तेव्हा निधी नाही मिळत पण विधानभवनाकडे मुख्यमंत्र्यांना जाण्यासाठी रस्ता एकदम गुळगुळीत करण्यात येत आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासाठी सरकार इतकी तयारी करत आहे. एकाच परिवारासाठी राज्यातील सर्व सुविधा देण्यात येत आहेत, असंही राणे म्हणाले आहेत. राज्याला मुख्यमंत्री राहिलेला नाही. राज्यातील जनतेसाठी हे अधिवेशन आहे पण मुख्यमंत्री मात्र दिसत नाहीत, असंही राणे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास असल्यानं रस्ते बनवण्यात आले आहेत यावरून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या सुरूवातीपासूनच गोंधळाला सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती, ओबीसी आरक्षण, पदभरतीतील गोंधळ, पंतप्रधानांची नक्कल यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांंच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या 

मोदींची नक्कल, भाजपचा राडा अन् भास्कर जाधवांनी मागितली बिनशर्त माफी

“भाजप अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?”

“रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्यायला काही हरकत नाही”

“उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नातं भाजप नेत्यांना कळणार नाही”

हिवाळी अधिवेशन: …म्हणून पहिल्याच दिवशी हिवाळी अधिवेशन स्थगित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More