Top News राजकारण

वीज बिलांवरुन नितेश राणेंची ठाकरे सरकारवर खोचक टीका, म्हणाले…

मुंबई | वाढीव विजबीलाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. त्यातच आता भाजप नेते नितेश राणे यांनीदेखील सरकारवर टीका केलीये.

नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केलीये. नितेश राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “या महाविकास आघाडी सरकारने “NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते.. विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..आणि मग.. Penguin Gang ची पार्टी सुरु!!!”

ठाकरे सरकारने वीज बिलांबाबत सामान्यांना दिलासा असं सुरुवातीला सांगितलं होतं, मात्र नंतर बीलं भरावी लागतील असं जाहीर केलं.

नितेश राणेंप्रमाणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारवर टीका केलीये. सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

आटपाडीत संजयकाका-पडळकर गटात मारामारी

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या