devendra fadnvis and nitin gadkari - मुख्यमंत्री आणि गडकरींना शिव्या देणारा पोलिस कर्मचारी निलंबित!
- Top News

मुख्यमंत्री आणि गडकरींना शिव्या देणारा पोलिस कर्मचारी निलंबित!

नागपूर | केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणाऱ्या पोलिस कर्माचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. प्रदिप मने असं या शिव्या देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

नागपूरमधील पाचगाव येथील पोलिस चौकीत तक्रार करायला काही तरूण गेले होते. तेव्हा मद्यधुंद अवस्थेत असलेल्या प्रदिप मने या पोलिस कर्मचाऱ्याने तक्रार घेण्यास नकार दिला. तसंच त्यांना शिवीगाळही केली.

त्यामुळे तरूणांनी त्यांचा वर्तनाचा व्हिडिओ काढला त्यामुळे ते चांगलेच भडकले आणि मुख्यमंत्री, गडकरी, पोलिस अधिकारी यांच्या सगळ्यांचा शिव्या घातल्या,

दरम्यान, या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करून या मद्यधुंद पोलिसाला निलंबित केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-जलसंधारण मंत्री राम शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; शेतकऱ्यांसोबत केली न्याहारी

-#MeToo | आणखी एका अभिनेत्रीचा लैगिंक शोषणाचा आरोप

-यातली सासू कोण? आणि सून कोण? लोणारमध्ये राज ठाकरेंचा सवाल

-ड्वेन ब्राव्हो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार नाही!

-मालकाचा दिलदारपणा; दिवाळीचा बोनस म्हणून 600 कर्मचाऱ्यांना मोफत कार वाटल्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा