राहुल गांधींना मराठी कधीपासून कळायला लागलं- नितीन गडकरी

नवी दिल्ली | मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 15 लाखांबाबत काहीही बोललेलो नाही, ज्या कार्यक्रमात हे बोललो, तो कार्यक्रम मराठीत होता आणि राहुल गांधींना मराठी कधीपासून कळायला लागलं, असा सवाल केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला.

मला आश्चर्य वाटते, की त्यांना मराठी कधीपासून कळायला लागलं. राहुल गांधींनी मराठी शिकून घ्यावं, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

आम्ही दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. मी भाजप किंवा मोदींचे नाव घेतले नाही. ती एक टेबल न्यूज होती. मी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. आम्ही दिलेली वचने पूर्ण केली आहेत, अस त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही सत्तेत कधीही येऊ शकणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास होता. यासाठी आम्हाला मोठ-मोठी आश्वासने देण्याचा सल्ला देण्यात आला होता, असं नितीन गडकरींनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

-येवलेकरांचे उपकार मी कधीच विसरणार नाही- छगन भुजबळ

-जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, मी नानांसोबत आहे!

-…म्हणून भाजपच्या माजी आमदारानं छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नाक घासून माफी मागावी!

-…म्हणून मोदींनी 15 लाखाचं आश्वासन दिलं होतं- नितीन गडकरी

-…त्या शिवाय पोलिसांनी देवीकडे जाऊ नये; संभाजी भिडेंच्या पोलिसांना सूचना